१७ जून रोजी ४५ वर्षावरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस
उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये दि.१७ जून रोजी ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नगर परिषद व खासगी शाळा, १ पोलिस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ फ्रन्टलाइन वर्करसाठी), ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्या वेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार असून या दिवशी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
लसीकरण केंद्रांची नावे पुढील प्रमाणे - उस्मानाबाद तालुका - ढोकी, कोंड, जागजी, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, पोहनेर, बेंबळी व समुद्रवाणी तर तुळजापूर तालुका - अणदूर, जळकोट, नळदुर्ग, सावरगाव, काटगाव, सलगरा (दि) व मंगरूळ (तु) तसेच उमरगा तालुका - मुळज, नाईचाकूर, येणेगुर, आलूर व डिग्गी तर लोहारा तालुका - कानेगाव, माकणी, जेवळी व आष्टा कासार तर कळंब तालुका - शिराढोण, येरमाळा, मोहा, दहिफळ, ईटकुर व मंगरूळ (क) व वाशी तालुका - पारा, पारगाव व तेरखेडा तसेच भूम तालुका - ईट, पाथरूड, माणकेश्वर, वालवड व अंबी तर परंडा तालुका - आसू आनाळा जवळा (नि) व शेळगाव तसेच ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद या केंद्रावर प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार आहेत.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद अंतर्गत मौलाना आझाद शाळा दगडी शाळा व नगरपरिषद शाळा क्रमांक ९ भीम नगर तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद अंतर्गत भाई उद्धवराव पाटील विद्यालय संभाजीनगर व नगरपरिषद शाळा क्रमांक २२ उंबरे कोटा या ठिकाणी प्रत्येकी २०० डोस सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देण्यात येणार. तर उर्वरित सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची वेळ सकाळी ९ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत देण्यात आली असून यासाठी एकूण ६० लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत.
ही लसीकरण सत्र सर्व तालुक्यांमधून राबविले जाणार असल्यामुळे शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या तालुक्यांमध्ये अथवा रुग्णालयांमध्ये पहिला डोस देण्यात येणार असून ज्यांनी यापूर्वी पहिला डोस ज्या आरोग्य केंद्रात घेतला होता. त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी टाळता येईल. लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. मात्र लसीकरण सत्र आयोजित केंद्रावर लाभार्थी संख्या एवढे कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणात टोकण वाटप करण्यात येणार आहेत.
यापूर्वी जरी वरील लसीकरण केंद्रांमधून टोकन वाटप झालेले असल्यास ते रद्द समजण्यात येऊन दि.१७ जून रोजी नव्याने टोकन वाटप केले जातील. तर संबंधित ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यारोबरोबरच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.