१३ जून रोजी ४५ वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस 

 
corona las

उस्मानाबाद  - जिल्ह्यामध्ये १३ जून रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे याकरिता जिल्ह्यामध्ये १३ जून रोजी ६ ग्रामीण रुग्णालय ४ उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे 

  ज्या लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सीन  लसीचा पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेले आहेत केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे जेणेकरून दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे या दिवशी कोव्हॅक्सीन लसीचा केवळ दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे या व्यतिरिक्त इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये 

ग्रामीण रुग्णालय मुरूम १५० ग्रामीण रुग्णालय लोहारा १३० ग्रामीण रुग्णालय सास्तूर १८० ग्रामीण रुग्णालय तेर १६० ग्रामीण रुग्णालय वाशी १६० ग्रामीण रुग्णालय भूम १५० उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर १३० उपजिल्हा रुग्णालय कळंब १२० उपजिल्हा रुग्णालय परंडा १७० उपजिल्हा रुग्णालय उमरगा १५० शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद १९० जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद १४०लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये १३ जून रोजी एकूण १२ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत आणि ही लसीकरण सत्र सर्व तालुक्यांमधून राबविले जाणार आहेत त्यामुळे शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या तालुक्यांमध्ये अथवा रुग्णालयांमध्ये पहिला डोस घेतला होता त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी टाळता येईल 

  लाभार्थ्यांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही लसीकरण सत्र आयोजित केंद्रावर लाभार्थी संख्या एवढे कोव्हॅक्सीन लसीचे डोस उपलब्ध ठेवण्यात आले आहेत लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत यापूर्वी जर वरीलपैकी लसीकरण केंद्रांमधून टोकण वाटप झालेले असल्यास ते रद्द समजण्यात येऊन १३ जून रोजी नव्याने टोकन वाटप केले जातील. 


 संबंधित ठिकाणच्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणा मध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच व्ही वडगावे व लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी केले आहे

From around the web