वॉर रूम मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे : कौस्तुभ दिवेगावकर

 
वॉर रूम मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे : कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद,- वॉर रुमसाठी ज्या अधिकाऱ्याकडे ज्या विषयाचे काम दिले  आहे , ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी एकमेकात चांगला समन्वय ठेवावा , असे  निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

जिल्हास्तरीय वॉर रुमच्या स्थापनेबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले आहेत.त्या बाबतची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली: तेव्हा ते बोलत होते.या बैठकीस जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार फड,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, या वॉर रुमचे सनियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे आदी उपस्थित होते.

या वॉर रूमचे काम सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत सुरू राहील . या साठी दोन टप्यांत अधिकारी – कर्मचारऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 पहिली टीम आणि दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुसरी टीम काम करेल. या वॉर रुमचे काम करण्यासाठी नेमलेल्या वॉर रुम कामकाज अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावयाची आहे. तसेच कामकाज अधिकाऱ्यांनीही स्वत: या कामासाठी वेळ द्यावयाचा आहे,असेही दिवेगावकर यांनी यावेळी सागितले.

यावेळी डॉ.फड यानीही मार्गदर्शन करून वॉररुममुळे कोरोनाच्या कामाचे नियोजन करण्याबरोबरच येणाऱ्या समस्याचेही निराकरण करण्यात मदत होईल, असे सांगतिले  यावेळी श्रीमती आवले आणि प्रताप काळे यांनीही मार्गदर्शन केले. 

From around the web