श्री तुळजाभवानी देवीची महाअलंकार नित्योपचार पूजा

आज ( शुक्रवार ) दुसरी माळ 
 
x
शारदीय नवरात्र महोत्सव-2021

उस्मानाबाद - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा आज करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ आहे.

तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली.  श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.   श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 09 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. 
यात, दि.09 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि.10 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.11 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.13 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.

s

तत्पूर्वी, काल रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

From around the web