नितीन काळे म्हणजे बंटी - बबली गँगचे ब्रँड अॅम्बेसेडर !
उस्मानाबाद - नितीन काळे म्हणजे बंटी बबली गँगचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यांच्यावर बोलुन शिळ्या कडीला कशाला ऊत आणायचा ? असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिष सोमाणी यांनी लगावला आहे.
पीक विम्यावरून शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्यानंतर त्यात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उडी घेतली होती.त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमाणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार ओमराजे यांचे वक्तव्य हस्यास्पद
मुख्यमंत्री यांच्याच आदेशाने राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारला म्हणजेच भाजपच्या सरकारला पत्र लिहुन विमा कंपनीचा तीन वर्षाचा करार रद्द करण्याची मागणी केली होती. जी शिवसेना विमा कंपन्याच्या विरोधात न्यायालयात लढा देत आहे. दुसऱ्या बाजुला भाजप सरकारने विमा कंपनीचा ना करार रद्द केला आजवर विमा कंपन्याच्या विरोधात ब्र शब्द काढला, मग सेंटलमेंट कोणाची असेल याची नितीन काळेनी माहिती सांगायची आवश्यकताच नाही.
तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी 'बंटी बबली'चा उल्लेख केल्याचे तुमच्या आठवणीत असेल,नसेल तर आम्ही आठवण करुन देतो. त्याच गँगचे तुम्ही आता अॅम्बेसेडर झालात याबद्दल तुमचे पहिल्यांदा मनपुर्वक अभिनंदन. मालकाने सांगितल्यावर भुंकणाऱ्याला आपल्या समाजात प्राण्याची उपमा देतात, पण आम्ही ती सुध्दा देणार नाही.कारण तो प्राणी सुध्दा त्याच्या मालकाबद्दल प्रामाणिक असतो. तुमच्याकडे तर तो गुणही नाही.
खासदाराबद्दल बोलताना तोंड सांभाळा . आपली लायकी,कुवत याचे भान राहु द्या.अन पहिल्यांदा एखाद्या वार्डातुन निवडुन तरी या त्याच्या अगोदरच तुम्ही देशाच्या योजनावर वगैरे बोलायला लागलात. तुमच्या मागच्या जिल्हाध्यक्ष काळात आम्ही सोबत होतो, त्यामुळे तुमचे सगळे दात आम्हाला ठाऊक आहेत.कोणत्या कार्यालयाकडुन कोणत्या अधिकाऱ्यांकडुन कसा हप्ता गोळा केला जात होता याच्याबद्दलही चांगल्याच चर्चा ऐकायला मिळायच्या.त्यामुळे झाकलेली मुठ आम्हाला उघडायला लावु नका असा इशारा तालुकाप्रमुख सोमाणी यांनी काळे यांना लगावला.