अडीच वर्षात ९ वैद्यकीय अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती

जिल्हा शासकीय रुग्णालयात एका प्रतिनियुक्तीचा रेट ४० ते ५० हजार 
 
s

धाराशिव  - धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुड ( जि. लातूर ) येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. गलांडे यांची उचलबांगडी करताना पदावनती  करण्यात आली आहे.  मागील अडीच वर्षात ९ वैद्यकीय अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्याची आल्याची माहिती  उघड  झाली आहे. 

प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , जिल्हा शल्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली होती. एका प्रतिनियुक्तीचा दर ४० ते ५० हजार होता. त्याची बातमी धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री  डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना चांगलेच धारेवर धरून  कानउघडणी केली, तसेच आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ अर्चना भोसले  यांना फोन करून कारवाई  करण्याचे  निर्देश दिले होते. 


अखेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुड ( जि. लातूर ) येथील   ग्रामीण रुग्णालयात वैद्यकाय अधीक्षक म्हणून उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक असलेल्या गलांडे यांची  पदावनती करण्यात आली आहे. 

९ वैद्यकीय अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती

सन २०२० ते आजतागायत जिल्हा शासकीय रुग्णालयातील एकूण किती वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली ? याची माहिती मागितली असता, ९ वैद्यकीय अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे तळ ठोकून  आहेत. अनेक अनेक वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालयात नावापुरती नोकरी करून खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. कालावधी उलटून गेल्यानंतर तसेच तक्रारीनंतर जरी बदली झाली तरी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पैसे देऊन प्रतिनियुक्ती घेऊन पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात ड्युटी दाखवत आहेत. 

का प्रतिनियुक्तीचा रेट ४० ते ५० हजार  ठरला होता. या संपूर्ण प्रतिनियुक्तीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून, दोषी शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आणि डॉ. राजाभाऊ गलांडे यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. 

From around the web