नळदुर्ग : सराफा दुकान फोडीतील आरोपी मुद्देमालासह 36 तासांत अटकेत 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी ( व्हिडीओ ) 
 
नळदुर्ग : सराफा दुकान फोडीतील आरोपी मुद्देमालासह 36 तासांत अटकेत

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील एका सराफा  दुकान फोडीतील आरोपीस मुद्देमालासह ३६ तासात अटक करण्यात स्थानिक पोलिसाना यश आले आहे. 

 रविंद्र दत्तात्रय पोतदार यांच्या जळकोट, ता. तुळजापूर येथील ‘श्रीपाद ज्वेलर्स’ या दुकानाचे कुलूप - शटरच्या पट्ट्या अज्ञात व्यक्तीने दि. 25- 26 एप्रील दरम्यानच्या रात्री तोडून दुकानातील 1 कि.ग्रॅ. चांदीचे दागिने- वस्तू,  45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 1,57,000 ₹ रोख रक्कम  असा एकुण 8,67,000 ₹ चा माल चोरुन नेला होता. यावरुन दुकान कारागीर- सागर बाबु महामुनी, रा. जळकोट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.नं. 133/ 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत दाखल आहे.

            गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पोनि-  गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- पांडुरंग माने, श्री भुजबळ, सपोफौ- खोत, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा विश्लेषनात्मक अभ्यास केला. तसेच गोपनीय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अखेर हा गुन्हा तुळजापूर तालूक्यातील हंगरगा पाटी येथील मोहन नागनाथ शिंदे, वय 20 वर्षे याने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह केला असल्याचे समजले.


 यावर पथकाने नमूद चोरीच्या माला पैकी चांदीचे दागिने- वस्तू, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 6,15,000 ₹ च्या मालास आरोपी- मोहन नागनाथ शिंदे यास आज दि. 27 एप्रील रोजी हंगरगा पाटी येथून ताब्यात घेउन पुढील तपासकामी त्यास नळदुर्ग पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यातील त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. स्था.गु.शा. च्या पथकाने केलेल्या या कामगीरीबद्दल  पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

From around the web