मुरूम : बापाचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप 

 
मुरूम : बापाचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप

 मुरुम:  मुरूम येथील धनराज ढाले याने आपल्या बापाचा शेती कसण्यावरून अंगावर रॉकेल टाकून पेटवून  खून केला होता.बापाचा खून करणाऱ्या या नराधम मुलास उमरगा सत्र  न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली. 

ख्याडे गल्ली, मुरुम, ता. उमरगा येथील मलकाप्पा तोटाप्पा ढाले यांच्याशी मुलगा- धनराज मलकाप्पा ढाले, वय 43 वर्षे हा शेती कसण्यावरुन नेहमी वाद करुन वडीलांना खुनाची धमकी देत होता. वडील- मलकाप्पा ढाले हे दि. 03.04.2017 रोजी 01.00 वा. सु. कडब्याच्या गंजीजवळ झोपलेले असतांना मुलगा- धनराज याने वडील- मलकाप्पा यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून देउन खून केला होता.

या खुन प्रकरणी मुरुम पो.ठा. येथे दाखल असलेल्या गु.र.क्र. 56 / 2017 चा तपास तत्कालीन पोउपनि- आर.ए. मोमीन यांनी करुन न्यायालयात भा.दं.सं. कलम- 302, 201, 435 नुसार दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 05 / 2017 चा निकाल काल 29 जानेवारी रोजी जाहिर झाला. उमरगा सत्र न्यायालय क्र. 1 चे न्यायाधिश श्री. एस.बी. साळुंखे यांनी आरोपी- धनराज मलकाप्पा ढाले, वय 43 वर्षे यास भा.दं.सं. कलम- 302 या खुनाच्या अपराधाबद्दल आजन्म कारावास व 5,000 ₹ दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त साधा कारावास आणि भा.दं.सं. कलम- 435 या कडब्याची गंजी जाळून कृषी पिकाचे नुकसानाच्या अपराधाबद्दल 5 वर्षे सश्रम कारावास व 4,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या दोन चालकांना प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा

 तुळजापूर: सार्वजनिक रस्त्यावर वाहन धोकादायकपणे उभे करुन रहदारीस धोका निर्माण करण्याची शक्यता निर्माण केल्याबद्दल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 1)ज्ञानेश्वर धनाजी माळी, रा. मंगरुळ 2)महोदव पंढरीनाथ दाभाडे, रा. करजखेडा या दोघांना भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मोटार वाहन कायदा अंतर्गत 249 कारवाया- 53,200 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 29.01.2021 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 249 कारवाया करुन 53,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

From around the web