भूम तालुक्यात सावत्र आई आणि बापाकडून आठ वर्षाच्या मुलाचा खून 

 
भूम तालुक्यात सावत्र आई आणि बापाकडून आठ वर्षाच्या मुलाचा खून

भूम -  संगोपनाच्या वादातून सावत्र आई आणि बापाने संगनमत करून आठ वर्षाच्या मुलाचा खून करून प्रेत विहिरीत टाकून दिल्याची घटना सोनगिरी येथे उघडकीस आली आहे. 

शुभम मुकेश गवळी, वय 8 वर्षे, रा. सोनगिरी, ता. भुम याचा मृतदेह दि. 25.12.2020 रोजी रात्री 20.00 वा. घरामागील विहीरीत आढळला होता. शुभमच्या संगोपनाच्या वादातून पिता: मुकेश रोहिदास गवळी व सावत्र आई: राधा यांनी शुभम याचा खुन केला आहे. अशा मजकुराच्या शुभमची सख्खी आई: श्रीमती साक्षी सिध्दार्थ सोनवणे, रा. पुणे यांनी काल दि. 26.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद जिल्हा: एका खेडेगावातील एक 10 वर्षीय मुलीगी (नाव- गाव गोपनीय) दुकान, शेतात जात असतांना गावातीलच एक तरुण ती मुलगी एकटी असल्याचा फायदा घेउन तीचा पाठलाग करत अश्लील इशारे करुन तीची छेड काढत होता. दि. 26.12.2020 रोजी 09.00 वा. ती मुलगी दुकानला जात असतांना तरुणाने तीला आडवून तीची छेड काढली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या वडीलाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (ड) आणि पोक्सो कायदा कलम- 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

कळंब: कळंब येथील सुफिया उर्दु कन्या प्रशाला शाळेच्या संगणक खोलीचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 24 ते 26.12.2020 रोजीच्या कालावधीत तोडून आतील एसीईआर कंपणीचे 2 संगणक व 2 सीपीयु चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या मुख्याध्यापक- मुनतजिबदीन सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web