तुळजापूर शहरात तरुणाचा खून 

 
Osmanabad police

तुळजापूर - तुळजापूर शहरात एका तरुणाचा  तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.  मृत तरुणाचे नाव शंकर दाजी गायकवाड (वय 25) असे असून तो काक्रंबाचा रहिवासी आहे. 


येथील जुने एसटी बसस्थानक ते लातूर रोड या ठिकाणी असणाऱ्या गोदामासमोरील रस्त्यानजीक सदर तरुणावर  तीक्ष्ण हत्याराने पोटावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. हा खून कोणी आणि कश्यासाठी केला ? हे अद्याप समजू शकले  नाही. 

जखमी झालेल्या तरुणाला  उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेल्या शंकर गायकवाड याच्यावर उपचार करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. तथापि उपचारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.

पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद तसेच फौजदार चव्हाण यासह पोलिस कम॔चाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बर्वे यांनी सदर तरुणाच्या  पोटावर गंभीर वार झाले होते असे सांगितले.


 

From around the web