MPSC : महाराष्ट्र दुय्यम सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा जिल्ह्यातील 27 उपकेंद्रावर

7704 परीक्षार्थी देणार परीक्षा 
 
a

उस्मानाबाद -   MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा अंतर्गत अराजपत्रित गट ‘ब’ ची पूर्व परीक्षा 2020 ही येत्या 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 यावेळेत एका सत्रात होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ही परीक्षा 27 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 7 हजार 704 परीक्षार्थी असणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे.

उपकेंद्राचा क्रमांक, उपकेंद्राचे नाव आणि तेथील परीक्षार्थींची संख्या अशी-

उस्मानाबाद येथील उपकेंद्र क्र.01 श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज, मेन रोड, तळ मजला  240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र.02 पहिला मजला 264 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 03 दुसरा मजला 432 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 04 तिसरा मजला 432 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 05 श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज, (आण्णा ई टेक्नो), नवीन इमारत, मेन रोड येथे 336 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 06 तांबरी विभागातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, पार्ट-A,336 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र.07 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड, 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 08 तांबरी विभागातील छत्रपती शिवाजी हायस्कूल 384 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र.09 बजाज शोरुमच्या पाठीमागे, भानू नगर, अभिनव इंग्लिश स्कूल, परीक्षार्थी संख्या 288, उपकेंद्र क्र.10 औरंगाबाद बायपास रोड, सांजा चौक, विद्यामाता हायस्कूल 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 11 तुळजापूर रोड, शासकीय तंत्रनिकेतन 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 12 तुळजापूर रोड, ग्रीनलँन्ड हायस्कूल 360 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 13 हातलादेवी कॅम्पस, जाधववाडी रोड, श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, पार्ट-A परीक्षार्थी 288, उपकेंद्र क्र.14 श्री श्री रविशंकर विद्यामंदिर पार्ट-B, 312 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र.15 एमआयडीसी परिसर, 

तेरणा आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज 216 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 16 तुळजापूर रोड, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 264 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 17 शहर पोलिस स्टेशनजवळ, जि.प.कन्या प्रशाला 264 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 18 सांजा रोड, समर्थ नगर, आर्य चाणक्य माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 19 उंबरे कोटा, बार्शी नाक्याजवळ, तेरणा पब्लिक स्कूल 336 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 20 सोलापूर बायपास रोड, विकास नगर समोर, आर.डी.नगर, पोदार इंटरनॅशनल स्कूल 192 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 21 बँक कॉलनी, सरस्वती हायस्कूल 216 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 22 नारायण बाग, टेक्नीकल हायस्कूलच्या पाठीमागे, भारत विद्यालय 240 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

 तुळजापूर येथील उपकेंद्र क्र. 23 सैनिकी विद्यालय 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 24 पापनाश गल्ली, तुळजाभवानी महाविद्यालय 264 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 25 नळदुर्ग रोड, विश्वनाथ नगर, हेलीपॅड जवळ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय 360 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र.26 नळदुर्ग रोड, जवाहर नवोदय विद्यालय 240 परीक्षार्थी, उपकेंद्र क्र. 27 उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, पार्ट-A 240 परीक्षार्थी असणार आहेत.

परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांना त्यांचे प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा पुरावा आणि त्याची छायांकित प्रत तसेच काळ्या शाईचा बॉल पेन इतकेच साहित्य घेऊन परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिला जाईल. याव्यतिरीक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही. या परीक्षेचे कामकाज करत असताना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तसेच स्थानिक प्राधिकरणांकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना, आदेश यांचे संबंधित परीक्षार्थींनी तसेच नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सेवा पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आणि परीक्षार्थींसाठी Basic Covid Kits, Extra Protective Kits आणि Personal Protective equipment Kits तसेच Extra 2 आणि 5 मिली सॅनिटायझर पाऊच चा पुरवठा करण्यात आला आहे.

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 27 उपकेंद्र परिसरामध्ये दि. 04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07:00 ते सायंकाळी 07:00 या कालावधीत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे या उपकेंद्राच्या 100 मी. परिसरामधील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदी माध्यमे बंद राहतील. तसेच उपकेंद्रावर परीक्षार्थी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या व्यतीरिक्त इतर कोणासही ( परीक्षार्थींचे नातेवाईक यांनाही ) प्रवेश असणार नाही. या परीक्षा उपकेंद्र परिसरामध्ये मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तेंव्हा परीक्षार्थींना कुठलीही भिती न बाळगता ही परीक्षा देण्याचे आवाहन श्री. स्वामी यांनी केले आहे.
 

From around the web