आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ 

तुळजापुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
 
s

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

या बंदोबस्तास उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील 1 अपर पोलीस अधीक्षक, 3 पोलीस उपअधीक्षक, 6 पोलीस निरीक्षक, 24 पोलीस उपनिरीक्षक, 245 पोलीस अंमलदार, 1,200 गृहरक्षक दल जवान, 1 बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे.

d

या सोबत राज्य भरातील अगदी मुंबई पासून नागपूर पर्यंतच्या महामार्ग सुरक्षा पथक, पोलीस प्रशिक्षन विद्यालये, सीआयडी, एसआयडी अशा विविध विभागांतील पोलीस बळ मागवण्यात आले आहे. अशा प्रकारे बाहेर जिल्ह्यातून 1 अपर पोलीस अधीक्षक, 10 पोलीस उपअधीक्षक, 27 पोलीस निरीक्षक, 38 पोलीस उपनिरीक्षक, 700 पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 कंपन्या, 4 बॉम्ब शोधक व नाशक पथक असे बंदोबस्तास प्राप्त झाले आहे. या सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील 24 शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत अधिग्रहीत करुन जिल्हा पोलीसांना पुरवण्यात आली आहेत. तसेच औरंगाबाद, बीड, जालना पोलीस दलातील 10 वाहने जिल्हा पोलीसांना पुरवण्यात आली आहेत.

d

तुळजापूर शहरात प्रशासनातर्फे उभारण्यात आलेले सीसीटीव्ही व मंदीरातील सीसीटीव्ही कक्षातून पोलीस या व्यवस्थेवर नजर ठेउन आहेत. तुळजापूरात येणाऱ्या मार्गांवर पोलीसांनी अडथळे (बॅरीकेड) व चौक्या उभारल्या असून आत येणारी वाहने, पर्यटक यांची कोविड मनाई आदेशांसंबंधी पुर्तता झाल्याची खात्री करुनच त्यांना गावात प्रवेश दिला जात असून तुळजापूरातील दोन्ही बसस्थानकांत साध्या पोशाखातील पोलीसांची गस्त सुरु आहे.

d

            बंदोबस्तातील पोलीसांना संपर्क साधने सुलभ व्हावे या उद्देशाने तुळजापूर येथील पोलीस संकुलात तात्पुरता नियंत्रण कक्ष व बिनतारी संदेश यंत्रना उभारण्यात आली आहे. या ठिकाणी बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत हे देखरेख करत आहेत.

From around the web