दूध भेसळ प्रकरणी जिल्ह्यात ९ ठिकाणी कारवाई

 19 नमुने पाठविले प्रयोगशाळेत
 
s

तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री.नंबर

 

धाराशिव  -  ग्राहकांना स्वच्छ,ताजे,निर्भेळ,दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयात दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे  अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव),वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्हातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत असून आजपर्यंत ९ आस्थापनामधून दुध, खवा,पनीर,रबडीचे एकूण १९ नमुने विश्लेषणासाठी घेतले.

हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.त्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

s

          मे.दत्तसाई मल्टीस्टेट को. ऑप.लि. उस्मानाबाद या आस्थापनामध्ये अस्वच्छ ठिकाणी अन्न पदार्थ उत्पादन/साठा करीत असल्यामुळे तपासणीवेळी या पेढीस उत्पादन व विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.आढळून आलेल्या अस्वच्छतेबाबत या पेढीविरुद्ध न्यायनिर्णयसाठी खटला दाखल करण्यात येत आहे.ही पेढी बंद करण्यात आली आहे.

         ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी श्री.शिंदे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री.ठोंबरे,सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी  न.त.मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे.

          दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास  कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

From around the web