गांजा तस्करीतील आरोपी मीना पाटील सांगोल्यात सापडली 

वृद्ध महिलेला मारहाण करून अंगावरील दागिने चोरले म्हणून अटक 
 
गांजा तस्करीतील आरोपी मीना पाटील सांगोल्यात सापडली

उस्मानाबाद - नळदुर्ग गांजा तस्करी प्रकरणारील आरोपी मीना पाटील हिला सांगोला पोलिसांनी एका महिलेच्या अंगावरील दागिने चोरी प्रकरणी अटक केली आहे. मीना पाटील हिला यापूर्वी तळेगाव दाभाडे  येथे एका कापड दुकानात साड्या चोरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. 


 परंडा तालुक्यातील शिराळा येथील साडी चोर मीना पाटील या महिलेच्या नावावर नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मधून गांजा तस्करी करत असताना असलेली एक कार पोलीस ठाण्यांमध्ये गांजा सह जप्त करण्यात आली होती. त्याचा शोध पोलीस करत होते .पण मिना पाटील पोलिसांना आजपर्यत चकवा देत होती.अखेर सांगोला  पोलिसांनी मीना पाटील हिला बेड्या ठोकल्या आहेत. 

तरंगेवाडी तालुका सांगोला येथील वृद्ध महिलेला कडलास येथे सोडतो असे म्हणून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून चार अज्ञात चोरट्यांनी तिला मारहाण करून १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून लूट केल्याची घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती.  त्या घटनेचा तपास सांगोला पोलीस करीत होते याच पद्धतीने जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन व मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक असे गुन्हे घडत असल्याने गुन्ह्यातील आरोपी व पांढऱ्या रंगाच्या गाडीचा शोध पोलीस घेत होते.  

दरम्यान ८ जानेवारी रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेस लूटमार करून स्विफ्ट कार सांगोल्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ पोलिसांची पथके जत रोड व मिरज रोडवर रवाना केली मात्र सदरची कार हि नाकेबंदी चुकून कडलास कडून सांगोल्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली मात्र चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने सांगोल्याच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी त्या कारचा पाठलागा सुरु केला .हि कार वाडेगाव, सावे ,देवळे ,बामणी, मांजरी, पवारवाडी पर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग पोलीस अधिकारी कर्मचारी कारचा पाटला करीत असताना सदर कार मांजरी तालुका सांगोला गावातील अशोक शिनगारे व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पवार वाडी पर्यंत पाटलाग करुन पकडली मात्र कार मधील एक महिला व पुरुष मक्याच्या पिकात पळून गेल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुमारे 25 एकर क्षेत्राच्या परिसरात ज्वारी मका ,डाळिंब ,अशा पिकातून या दोघांचा सुमारे अडीच तास शोध घेऊन ताब्यात घेतले .

 यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार फायबरचे दंडूके ,कपडे व उमदी येथील महिलेचे चोरलेले सुमारे १ लाख 46 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले या गुन्ह्यात ज्ञानेश्वर विठ्ठल घोरपडे राहणार उपळवटे तालुका माढा व मीना पाटील राहणार शिराळा तालुका परंडा या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवार 13 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत. सोलापूर ,उस्मानाबाद, सांगली हद्दीत केलेले गुन्हे अनेक उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. 


ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक आतुल झेंडे ,उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब माने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश यमगर सपोनि बाळासाहेब माने सपोनि गणेश यमगर सपोफौ कल्याण ढवणे फौजदार लतिफ मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा पवार पोलीस नाईक प्रमोद गवळी पोलीस नाईक विजय थिटे पोलीस नाईक सुनील मोरे पोलीस नाईक दत्ता वजाळे पोलीस नाईक सचिन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल राहुल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब पाटील व महिला होमगार्ड जयश्री नांगरे बायडा लवटे नंदा लगदिवे यांनी केली

From around the web