कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी  सुक्ष्म नियोजन करा - अजित पवार 

प्रत्येक खासगी कोरोना रुग्णांलयात ऑडिटर 
 
S

उस्मानाबाद - कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी राज्य सरकार आपणास सर्वप्रकारची मदत करीत आहे.त्यामुळे लोकांचे प्राण वाचविण्याचे काम प्रामाणिकपणे करा.कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा.कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी आवश्यतकती व्यवस्था निर्माण करा,खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्याचे जिल्हयास दिलेले उद्दिष्ट येत्या 15 जुलै पर्यंत पूर्ण करा,असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

जिल्हयातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या उपायायोजनांबाबत आणि जिल्हयातील खरीप हंगामाबाबतचा आढावा घेण्याची बैठक उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, तेव्हा ते बोलत होते.यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे,जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे,सुरेश धस, ज्ञानराज चौगुले,कैलास पाटील,राणाजगजिसिंह पाटील,विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी,डॉ.विजयकुमार फड,जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी  एच.व्ही.वडगावे,जिल्हा कृषी अधिकारी उमेश घाटगे,जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

ऑक्सिजनच्या वापराचे दैनदिन ऑडिट करून योग्य प्रकारे ऑक्सिजनचा वापर झाल्याने ऑक्सिजनची मागणी वाढवूनही जिल्हयात टंचाई निर्माण झाली नाही,अशी माहिती बैठकीत दिली असता उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक करून या पुढेही असेच नियोजन करा,आवश्यक तिथे ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभे करण्याची कार्यवाही करा,त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात,त्यातही ऑक्सिजन प्लँटला वीज पुरवठा करताना वीज कंपनीने कारणे आणि समस्या न सांगता वीज पुरवठा वेळेवर करावा,त्यासाठी आवश्यक ती कामे करावीत; असे सांगून धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्लँटला वीज पुरवठा करताना झालेला विलंब आणि तक्रारी योग्य नव्हत्या,त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मान्येतेचे अधिकार मुख्यालयात असल्याचे सांगितले.त्यावरी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून यासंबंधिचे अधिकार जिल्हयाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे आदेशच दिले.

बालरोग तज्ज्ञांची टंचाई जिल्हयात भासत आहे.त्यावर उपायायोजना करण्याची आणि अनुभवी उच्चशिक्षित बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी केली असता, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे योग्य ती कार्यवाही करतीलच. त्याचबरोबर खासगी बालरोग तज्ज्ञांची सेवा घेण्याबरोबरच आता कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्रॅश कोर्स सारखे प्रशिक्षण देऊन त्यांचा उपयोग करा,असेही त्यांनी सूचित केले.तर आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी पदवीव्युत्तर पदवी प्राप्त दोन बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे काम केले जाईल,असे यावेळी आश्वासित केले.

    जिल्हयात कोरोना लसीकरणाचे काम करताना दिव्यांग,वृध्द यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तारीख निश्चित करून त्यांना एकाच ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करा.शहरांमध्ये प्रत्येक वॉर्डात जाऊन लसीकरण करण्याची योजनाही चांगली आहे. त्यात लोकप्रतिनिधीना सहभागी करून घ्या.कोरोना लसीकरणाचा भविष्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात नक्कीच मदत होईल,असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.आमदारांच्या  निधीतून घेण्यात येत असलेल्या  ॲम्बुलंन्ससाठी वाहन चालकांची आडचण सांगितली जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला असता जिल्हा परिषदेने करार पध्दतीने वाहनचालक घ्यावीत,असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.आमदार चौगुले यांनी स्पर्श हॉस्पिटलची बेड संख्या 200 करण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर करावा,असेही ते म्हणाले.

    कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या लपवण्याचे राज्य शासनाचे कोणतेही धोरण नाही.त्यामुळे संबंधित यंत्रणेने ही आकडेवारी वस्तूनिष्ठ पध्दतीनेच नोंदवावी; असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मधल्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई होती पण आता ही इंजेक्शन योग्य प्रमाणात उपलब्ध होत आहेत.परंतु म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा अद्यापही पुरवठा मागणी प्रमाणे केंद्र सरकार कडून होत नाही. मधल्या काळात केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना  म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुलै पर्यंत याही इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची गरज आहे.सध्याच्या जिल्हा शल्य चिक्त्सिालयाची  जमीनीचे हस्तांतरणाचा करार सार्वजनिक आरोग्य विभाग  आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात लवकरच होईल.त्यानंतर निधीही उपलब्ध करून दिला जाईल.आयटीआयची रिकामी जमीनही वैद्यकीय महाविद्यालयासाठी घेता येईल,याबाबत मी संबंधित विभागाच्या मंत्री आणि सचिवाशी  बोलेन .तसेच राज्यातील आयटीआयचा विकास करण्यासाठी टाटा समुहाशी  करार झाला आहे.त्यामुळे येथील आयटीआयमधील सुविधा संवंर्धनाचा  विचार केला जाईल.वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारही मदत करत असे पण अलिकडे त्याच्याही घोरणात बदल झाला आहे.तरीही या महाविद्यालयासाठी केंद्राकडेही पाठपुरावा केला जाईल;असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

    ज्या ज्या जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढती  आहे त्या त्या जिल्हयात जाऊन  जिल्हाप्रशासन आणि विभागीय आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांशी संवाद साधून तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याबरोबरच ऑक्सिजन प्लॅटची  उभारणी, साधनसामग्री, मनुष्यबळ आदींचा  आढावा घेतला जात आहे.

कोरोनाग्रस्त बालकांसाठी आधुनिक आणि वेगळे व्हेंटीलेटर लागणार आहेत.त्यांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे; असेही श्री.पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.जिल्हयातील खरीपाच्या हंगामाचा आढावा घेताना जिल्हयात डीएपी खताची टंचाई आहे. पण त्याबाबत कृषी आयुक्तांशी बोलून अडचण सोडविली जाईल.जिल्हयात युरियाचा मुबलक साठा आहे.जिल्हयात या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे 1539 कोटी रूपयांचे 


उदिष्ट आहे.सध्या उदिष्टपूर्ती अल्पस्वरूपात साध्य झाली असली तरी जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे.30 जून पर्यंत प्राधान्याने पीक कर्जाचा पुरवठा करण्यात यावा आणि 15 जुलै 2021 पर्यंत पीक कर्जाचे उदिष्ट पूर्ण करावे,असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.पीक विम्याबाबत मुंबईत मंत्री दादा भुसे आणि सचिव एकनाथ डवले यांच्याशी बोलून मार्ग काढण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेस राज्य शासनाने कर्ज हमीचा निधी देण्याची मागणी केली आहे.त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल,असेही ते म्हणाले. सुरूवातीस जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी कोरोनाबाबत संगणकीय सादरीकरणाव्दारे माहिती दिली तर जिल्हा कृषी अधीक्षक श्री. घाटगे यांनी बैठकीत माहिती दिली.
 
आमदारांना आणखी एक कोटी रुपये देणार 

आमदारांना त्याच्या चार कोटी निधी पैकी एक कोटी रूपये कोरोनावर खर्च करण्यास परवानगी दिली होती.त्यांचा एक कोटीचा निधी खर्च झाला आहे.त्यामुळे अनेक आमदारांनी एक कोटी रुपये उपलब्ध करून दयावेत, अशी मागणी केली आहे. आमदारांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी  मंत्री मंडळात चर्चा करून आमदारांना एक कोटी रूपये दिले जातील.

प्रत्येक खासगी कोरोना रुग्णांलयात ऑडिटर 

खासगी रुग्णांलयांनी कोरोना रुग्णाकडून उपचाराचा शुल्क कशा प्रकारे घ्यावी याबाबत राज्य शासनाने शुल्क निश्चित करून दिले आहेत.त्यांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक खासगी कोरोना रुग्णालयात 24 तास ऑडिटर उपलब्ध असतील.

कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे आदेश

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊन मध्ये शिथीलता देण्यात आली आहे.पण लोक बिनधास्त फिरतात. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढतो, त्यामुळे कोरोनाच्या चाचण्याची संख्या वाढवा.जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर पोलीसांनी कार्यवाही करावी,असेही निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

From around the web