नळदुर्ग दंगलीतील मुख्य आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी
नळदुर्ग - नळदुर्गमध्ये काही दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या दोन्ही गटातील लोकांवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही गटातील काही लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र एका गटातील मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून देखील पोलीस त्यास पोलीस अटक करीत नव्हते .
हा आरोपी 'शाहीन' मारत गावात मोकाट आणि उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नव्हते,धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळत तलवार जप्त केली. शाहीन काझी असे या दंगलखोराचे नाव आहे.त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
नळदुर्गमध्ये एका महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर कारवाई केली, पण पोलीस स्टेशनसमोर आरोपी शाहीन काझी याचे घर असताना, अटक करण्याचे धाडस पोलीस दाखवत नव्हते.
शहरात भाई गॅंग तयार करून दहशत निर्माण करणे, फेसबुक, इंस्टाग्रामवर पोलीस स्टेशनमध्ये रील तयार करून पोलिसानाच उघड आव्हान देणे, पोलिसांची टोपी घालून रील तयार करणे असे उद्योग या गॅंगमधील टवाळखोर करीत होते तसेच किल्ल्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना मारहाण करणे, एका विशिष्ठ जातीच्या लोकांना टार्गेट करून मारहाण करीत होते..तरी नळदुर्ग पोलीस मूग गिळून गप्प होते.
याबाबत धाराशिव लाइव्हने बातमी प्रकाशित करताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सपोनि गोरे यांची धाराशिव पोलीस मुख्यालयात बोलावून चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर चार दिवसापूर्वी गुंडगिरी आणि दहशत निर्माण करणारा आरोपी शाहीन काझी यास चार दिवसापूर्वी अटक करण्यात आली. यावेळी तलवार देखील जप्त करण्यात आली. त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आल्यानंतर आज जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
नळदुर्ग दंगलीतील आरोपीची धिंड काढणाऱ्या पोलिसांनी शाहीन काझी याची मात्र धिंड न काढता चांगली बडदास्त ठेवली, इतकेच काय तर ही बातमी अत्यंत गुप्त ठेवली. १० ते १५ लिटर दारू पकडली तरी प्रेस नोट मध्ये बातमी देणाऱ्या नळदुर्ग पोलिसांनी ही बातमी मात्र दाबून ठेवली. स्थानिक पत्रकार देखील ही बातमी देण्याचे धाडस केले नाही.
नळदुर्ग परिसरात गोरेंच्या काळ्या कारभारामुळे अवैध धंदे तर फोफावले आहेतच पण कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडली आहे. भाई गॅंगमधील टवाळखोर पोलिसांच्या अंगावर धावून गेले तरी पोलीस कारवाई करण्यास कचरत होते, हे विशेष , पण धाराशिव लाइव्हने भाई गॅंगचा पर्दाफाश केल्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी दाखल घेत मुख्य आरोपी शाहीन काझी याच्या मुसक्या आवळल्या आहेत.