अणदूरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 

 
अणदूरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी

अणदूर - तुळजापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणदूरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी एकत्र आली आहे. माजी मंत्री  मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण विरुद्ध  ऍड. दीपक आलुरे यांचे पॅनल आमने - सामने आहे. एकूण १७ जागेसाठी निवडणूक होत आहे. 

ऍड. दीपक आलुरे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतुत्वाखाली राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.एक वर्षांपूर्वी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ऍड. दीपक आलुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऍड. आलुरे यांच्या नेतुत्वाखाली भाजपचे  पॅनल उभे आहे तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे. 

अणदूर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र ऍड. दीपक आलुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला चांगले बळ मिळाले आहे. शिवसेनेचे अस्तित्व नगण्य आहे. राष्ट्रवादी असून नसल्यासारखी आहे. मात्र काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले आहे. 

काँग्रेसकडून माजी सरपंच सरिता बालाजी मोकाशे, धनराज अण्णाराव मुळे , डॉ. नागनाथ सिद्रामप्पा  कुंभार, रामचंद्र बसन्नाप्पा आलुरे, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. विवेक बिराजदार आदी तगडे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. शिवसेनेकडून बाळकृष्ण घोडके आपले नशीब अजमावीत आहेत.

भाजपकडून माणिक आलुरे, दयानंद मुडके, साहेबराव घुगे, प्रवीण घोडके आदींनी कंबर कसली आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. अणदूरची जनता कोणाच्या पारड्यात कौल देणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

From around the web