उस्मानाबाद : ऑनलाईन पध्दतीने पोलीसांच्या प्रशासकीय बदल्या

 
 उस्मानाबाद :  ऑनलाईन पध्दतीने पोलीसांच्या प्रशासकीय बदल्या


उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल (PC) ते सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यांच्या सन- 2019- 20 या वर्षातील प्रशासकीय बदल्या या नुकत्याच ‘एम- पोलीस’ या ऑनलाईन ॲप्लीकेशनच्या सहायाने करण्यात आल्या.


            प्रशासकीय बदल्यांस पात्र असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे अगोदर प्रसिध्द करुन त्यांच्याकडून अपेक्षीत 3 प्राधान्यक्रम मागवण्यात आले. उपलब्ध रिक्त जागांचा विचार करुन त्यांना अपेक्षीत असलेल्या पोलीस ठाणी / शाखा येथे प्राधान्यक्रमाने बदली देण्यात आली. ज्या पोलीसांना तशी प्राधान्यक्रम दिलेल्या पोलीस ठाणी / शाखा येथे बदली करणे शक्य होत नव्हते अशा पोलीसांना मा. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन त्यांना अपेक्षीत असलेल्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली. अशा प्रकारे या बदल्या पारदर्शक पध्दतीने पार पडल्या.


उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive

From around the web