दहावीचा सोमवारचा पेपर लांबणीवर

 
दहावीचा सोमवारचा पेपर लांबणीवर

मुंबई:कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावीचा सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे.

दहावीची ही शेवटची भूगोल विषयाची परीक्षा यानंतर कोणत्या दिवशी घेतली जाईल, याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्च रोजी होता. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या एक भाग म्हणून ही परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आली आहे.

हा पेपर पुन्हा कधी होणार याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाणार आहे. दहावीची भूगोल या विषयाची परीक्षा सोमवारी सकाळच्या सत्रात होणार होती. सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा पेपर होणार होता. मात्र ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'दहावीचं वर्ष हे शैक्षणिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं वर्ष असतं. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांवर त्यामुळे तणाव असणं स्वाभाविक आहे. पण सध्याची राज्यातली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय आम्हाला घेणं भाग आहे. मला खात्री आहे की विद्यार्थी-पालक प्रशासनाला नक्की सहकार्य करतील.'

From around the web