उस्मानाबाद : कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 
उस्मानाबाद : कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत      उस्मानाबाद -विभागामार्फत सन २०२०-२१ मध्ये डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना मधील पात्र व प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांमधुन नविन सिंचन विहिर पॅकेज मागणी केलेल्या लाभाच्यांना नविन सिंचन विहिर हि बाब राष्ट्रीय कृषि विकास योजना सन २०२०-२१ या योजनेमधुन लक्षांक मर्यादेत देण्यात येणार आहे. नविन सिंचन विहिर या बाबीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा २.५० लक्ष इतके अनुदान देण्यात येईल. उस्मानाबाद जिल्हयातील जास्तीत जास्त लाभाध्यांना लाभ देता यावा. यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज कार्यप्रणाली उपलब्ध झालेली आहे.


या योजना अटी व शती पूढील प्रमाणे आहेत. शेतकरी हा अनु.जाती किंवा अनु.जमाती प्रवर्गातील असावा. शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतक-याच्या स्वतःच्या नावे किमान ००.४० हेक्टर कमाल ०६.०० हेक्टर शेतजमीन असली पाहिजे.  शेतक-याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपंचायत, नगरपरीषद व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील.)  शेतक-याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. शेतक-याकडे आधार कार्डशी सलग्न केलेले बँक खाते असावे. प्रस्तावित नविन सिंचन विहिर हि अस्तीत्वात असलेल्या विहिरीपासुन ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी. परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ वनपटटे धारक तसेच स्व.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व


स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतक-यांची प्राधान्याने लाभार्थी म्हणुन निवड करण्यात येईल. ज्या शेतक-याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न १.५० लक्ष च्या मर्यादेत असावे.अशा शेतक-यांनी तहसिलदार यांचेकडुन सन २०१९-२० चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला अर्जासाबत सादर करणे बंधनकारक राहील.


अटी व शर्तीची पुर्तता करणा-या सर्व शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.असे आवाहन सभापती कृषि व पशुसंवर्धन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.


                                             

From around the web