लोहारा: खेड गावात चार कावळे मृत आढळले
पक्षाचे मृत्यू झाल्याचे आढळल्यास पशुसर्वधन विभागास माहिती द्यावी
Tue, 12 Jan 2021

उस्मानाबाद - राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे एकीकडे घबराट पसरली असताना, लोहारा तालुक्यातील खेडमध्ये चार कावळे मृत आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर आज दि.12 जानेवारी 2021 रोजी जिल्हयातील लोहारा तालुका खेड येथे चार कावळे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. या मृत कावळयाची पाहणी करून आणि विहीत पध्दतीचा अवलंब करून मृत कावळयाचे शव रोगनिदनासाठी रोग अन्वेषण प्रयोग शाळा पुणे येथे खास दुतामार्फत तातडीने तपासणीसाठी पाठविले आहे.
खेड या गावच्या परिसरातील कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांनी पक्षी प्रजातीमध्ये कोणत्याही प्रकारचे मृत झाल्याचे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशु वैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन उस्मानाबाद येथील पशुसर्वधन विभागातर्फे करण्यात आले आहे.