लोहारा : नगर अभियंता अमर राऊत यांच्यासह दोघांना २५ हजार लाच घेताना पकडले 

 
लोहारा : नगर अभियंता अमर राऊत यांच्यासह दोघांना २५ हजार लाच घेताना पकडले

लोहारा - लोहारा नगर पंचायतचे नगर अभियंता अमर राऊत यांच्यासह  दोघांना २५  हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक ( एसीबी ) पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. 

लोहारा येथील ३७ वर्षीय  तक्रारदाराच्या नावावर दोन प्लॉट आहेत. या प्लॉटची कंपाऊंडिंग करून देण्यासाठी  लोहारा नगर पंचायतचे नगर अभियंता अमर जनार्धन राऊत  यांनी ५० हजार लाचेची मागणी केली. यात खासगी इसम अब्दुल अजीज सय्यद याने मध्यस्थी केली. तडजोडीअंती २५ हजार देण्याचे ठरले. 

दरम्यान, तक्रारदाराने उस्मानाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक ( एसीबी )  विभागाशी संपर्क साधला. पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे  आणि त्यांच्या पथकाने आज ( शुक्रवार ) रोजी सापळा रचून नगर अभियंता अमर राऊत  आणि खासगी इसम इसम अब्दुल अजीज सय्यद यांना  २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. 

याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, राऊत आणि  सय्यद यास अटक करण्यात आली आहे. 

From around the web