लॉकडाऊन: मनाई आदेश झुगारुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
a

कळंब: कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारीकेलेले मनाई आदेश झूगारुन 1)सावित्रीबाई कल्याण पवार 2)सखुबाई शिवाजी पवार 3)शंकर कल्याण पवार 4)सुनिल कल्याण पवार, सर्व रा. पारधी पिढी, कळंब यांनी दि. 05.05.2021 रोजी 21.35 वा. सु. कल्पनानगर पारधी पिढी, कळंब येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकांची गर्दी जमवली. तसेच सोशल डिस्टन्सींग न ठेवता व नाका- तोंडास मास्क न लावता कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन कळंब  पो.ठा. चे पोकॉ- युवराज चेडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लॉकडाऊन: मनाई आदेश झुगारुन केशकर्तनालय चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

नळदुर्ग: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी केशकर्तनालय व्यवसायाबाबत मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन नामदेव दत्ता सोमवंशी, रा. काटगाव, ता. तुळजापूर यांनी दि. 06 मे रोजी 11.30 वा. सु. गावातील आपले ‘आशिर्वाद हेअर सलुन’ हे दुकान चालू ठेउन व्यवसाय केला. यावरुन नळदुर्ग पो.ठा. चे पोकॉ- अतुल साळुंखे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 आंबी: आंबी पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- बाळासाहेब हिराजी होडशीळ हे दि. 06.05.2021 रोजी 18.30 वा. सु. पो.ठा. हद्दीतील तिंत्रज येथे कर्तव्या निमीत्त गस्तीस होते. यावेळी 1)अभिजीत तिटके 2)रुपेश अशोक साळुंके 3)राजेंद्र तानाजी भोसले, तीघे रा. पाथ्रुड, ता. भुम यांनी संगणमताने बाळासाहेब होडशीळ यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. अशा प्रकारे नमूद तीघांनी बाळासाहेब होडशीळ यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पोहेकॉ- बाळासाहेब होडशीळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 186, 332, 336, 269, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 110, 112, 117 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web