लॉकडाऊन कायम : उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी संमेलन,मेळावे घेण्यास प्रतिबंध

 
लॉकडाऊन कायम : उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी संमेलन,मेळावे घेण्यास प्रतिबंध

 उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून यायापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश दि. 31 डिसेंबर 2020 पर्यत लागू आहेत.

      उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19)चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना (SOP) विचारात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे यांना मोठी संमेलन/मेळावे घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असल्याने धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे यांना अनियंत्रित गर्दी होईल असे मोठे मेळावे/संमेलने/यात्रा/उत्सव यांचे आयोजन करण्यास परवानगी असणार नाही. तथापि धार्मिक विधी, कुळाचाराचे पालन करण्यास परवानगी राहील. यावेळी एका ठिकाणी सभा, समारंभ इ.करीता अनुज्ञेय लोकांची संख्या याचे पालन करणे अनिवार्य राहील,

जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे पुन्हा चालू करण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे या ठिकाणी कोविङ-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

    सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60,महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर पात्र राहील.

From around the web