कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने तुळजाभवानी मंदिरात मर्यादित प्रवेश 

नवी नियमावली जाहीर, मंदिरात मास्क काढल्यास पाचशे रुपये दंड !
 
कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने तुळजाभवानी मंदिरात मर्यादित प्रवेश
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात आता ऑनलाईन, ऑफलाईन , सशुल्क प्रवेश संख्या बारा हजार करण्यात आली आहे. त्यात मोफत पास  संख्या दहा हजार तर पेड दर्शन संख्या दोन हजार करण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षाखालील लहान मुले तसेच मास्क न वापरणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. 

तुळजापूर  - राज्यात कोरोना या संसर्गजन्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना  देण्यात येणाऱ्या दैनंदिन मोफत पासची संख्या 24 फेब्रुवारी-2021 पासून दहा हजार तर दैनंदिन पेड दर्शन पासची संख्या दोन हजार एवढी निरिश्च करण्यात आली आहे,याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

           श्री.तुळजाभवानी मंदिरात कोरोना (COVID-19) या संसर्गजन्य रोगाचा प्रसार वाढू नये म्हणून या पार्श्वभूमीवर मर्यादीत संख्येत ऑनलाईन,ऑफलाईन आणि सशुल्क पासद्वारे भाविकांची दर्शनाची सोय करण्यांत येत आहे.जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या 18 फेब्रुवारीच्या आदेशानुसार श्रीदेविजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दैनंदिन मोफत पास संख्या दहा हजार आणि दैनंदिन पेड दर्शन पास संख्या दोन हजार एवढी निश्चित करण्यात येत आहे.भाविकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने दर्शन पास घेऊन श्री देविजींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नारिकांनी आणि दहा वर्षाखालील लहान मुले आणि मास्क न वापरणाऱ्या भाविकांना श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्व पुजारी बांधव,भाविक भक्त आणि नागरिकांनी नोंद घ्यावी,असेही आवाहन तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन)तथा,तहसीलदार यांनी केले आहे.

         शासन आदेशाद्वारे जाहिर केलेल्या धार्मिकस्थळे/प्रार्थनास्थळे या ठिकाणी करावयाच्या नियमांचे पालन करुन भाविकांनी श्रीदेविजींचे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यांत आले आहे.दैनंदिन निर्जंतुकीकरण,सामाजिक अंतराचे पालन,मास्क आणि सॅनिटायझरचा वापर याबाबी सर्वांसाठी बंधनकारक राहतील.मंदिर आणि मंदिर परिसरात मद्यपान,पान,गुटखा इत्यादी तत्सम पदार्थांचे सेवन करता येणार नाही. तसेच मंदिर आणि मंदिर परिसरात नाक तसेच तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर प्रथमवेळी पाचशे रुपये आणि पुन्हा आढळल्यास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल.घरी रहा सुरक्षीत रहा या संकल्पनेतून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील लहान मुले भाविक  भक्तांनी श्री देविजींचे दर्शन www.shrituljabhavani.org या मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर घेवून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे.नो मास्क नो इंट्री चे पालन करावे,असेही आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

मंदिर परिसरात  दररोज सॅनेटायझर फवारणी करण्यात येत आहे. मंदिर परिसरात पान , गुटखा सेवन करता येणार नाही, तसेच मंदिर परिसरात नाक आणि तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड व पुन्हा आढळल्यास  एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.    


 

From around the web