नळदुर्ग परिसरात बिबट्या आलाच नाही

लोकांनी अफवा पसरू नये - वन अधिकारी 
 
C

नळदुर्ग -  नळदुर्ग परिसरातील अंबाबाई  मठासमोर (  नानीमाँ दर्गा पाठीमागे ) शेतात  बिबट्या आल्याचा कोणताही पुरावा वन विभागाला सापडला नाही. लोकांनी अफवेवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन तुळजापूर विभागाचे  वन परिक्षेत्र अधिकारी  चौगुले यांनी केले आहे. 

 नळदुर्ग परिसरातील अंबाबाई  मठासमोर (  नानीमाँ दर्गा पाठीमागे ) शेतात  बिबट्या बिबट्या आल्याची आणि त्याने एक शेळी खाल्याची बातमी काही समाजकंटकांनी पसरवली. त्याच्या बातम्या काही युट्युब चॅनलने दिल्याने लोकांत अधिकच घबराट पसरली. वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन पिंजरे देखील या भागात लावले, विशेष म्हणजे नाईट कॅमेरे लावले. परंतु कोणताही पुरावा आढळला नाही. 

 तुळजापूर विभागाचे  वन परिक्षेत्र अधिकारी  चौगुले यांच्याशी सपंर्क साधला असता, त्यांनी सांगितले की , मागील दोन दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी या भागात तळ ठोकून आहेत, पण बिबट्या किंवा बिबट्या दृश्य प्राणी या भागात अद्याप आढळला नाही किंवा त्याची पृष्टि मिळाली नाही.   लोकांनी अफवेवर विश्वास ठेऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. काही युट्युब चॅनलने दुसरीकडील फोटो लावून बातमी प्रकाशित केल्याने लोकात घबराट निर्माण झाली असून, पत्रकारानी देखील बातम्या देताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

From around the web