उस्मानाबाद जिल्ह्यातील गावनिहाय सरपंच पदाची सोडत १८ डिसेंबर रोजी 

अनेक इच्छूकांनी देव पाण्यात ठेवले !
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील गावनिहाय सरपंच पदाची सोडत १८ डिसेंबर रोजी

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील मुदत संपलेल्या  ६२२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण निश्चित केल्यानंतर गावनिहाय आरक्षणाची  सोडत येत्या १८ डिसेंबर काढण्यात येणार आहे, त्यामुळे सरपंच होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. 


उस्मानाबाद जिल्हयात ग्रामपंचायतीच्या  एकुण 622 पदातील अनुसूचित जातीसाठी 101 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आली असून त्यातील 53 पदे महिलांसाठी असणार आहेत.अनुसूचित जमातीसाठी 14 पैकी महिलासाठी 9 पदे तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकुण 168 पदापैकी 86 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 339 पैकी 172 पदे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.त्यानंतर गावनिहाय सोडत काढण्यात येणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील १११ व तुळजापूर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची शुक्रवारी, दि.१८ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याने सर्वत्र राजकीय चुरशीला प्रारंभ झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने पारावर गप्पा रंगू लागल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींची मुदत चार महिन्यापूर्वी संपली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने या निवडणुका पुढे ढकलून शासकीय आधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण घेण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार ही सोडत होणार आहे.

सोडतीमुळे अनेकांचे देव पाण्यात

तुळजापूर तालुक्यातील अणदूर, मंगरूळ, तामलवाडी, जळकोट, सिंदफळ आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि मोठ्या असलेल्या ५३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत दि. १८ डिसेंबर होत आहे. या सोडतीत सरपंचपद अपेक्षित प्रवर्गासाठी सुटावे म्हणून अनेक इच्छुकांनी देव पाण्यात सोडले आहेत. दुसरीकडे आरक्षणाची सोडत जाहीर हाेताच निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. 


तुळजापूर तालुक्यातील अणदूर, मंगरूळ, तामलवाडी, जळकोट, सिंदफळ आदी मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ५३ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहेत. गत विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत होणाऱ्या या तालुक्यातील पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका असल्याने या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे बोलले जात आहे.


पहिल्या टप्प्यात अनेक प्रतिष्ठेच्या निवडणुका

उस्मानाबाद तालुक्यातील १७ सदस्य असलेली बेंबळी १५ सदस्य, सांजा १३ सदस्य, जागजी, पळसप, वाघोली व कारी या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आळणी, वडगाव, चिखली, घाटंग्री व खेड या गावांचा समावेश आहे. ९ सदस्य असलेल्या ३९ ग्रामपंचायत व ७ सदस्य असलेल्या १६ अशा एकूण ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत.

 या ठिकाणी होणार सोडत 

From around the web