अणदूर, नळदुर्ग, करजखेडा येथे  कोविड सेंटर सुरू होणार 

आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी केली जागेची पाहणी 
 
अणदूर, नळदुर्ग, करजखेडा येथे कोविड सेंटर सुरू होणार

तुळजापूर - ग्रामीण भागात वाढत चाललेला कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्याची संकल्पना आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी मांडली होती. या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक गावातील नागरिकांनी गावात कोवीड केयर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी आज नळदुर्ग, अणदूर व करजखेडा येथे भेट देऊन कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पाहणी केली. 


नळदुर्ग शहराची लोकसंख्या जवळपास 32 हजार असून सातत्याने पाठपुरावा करून देखील तेथील ग्रामीण रुग्णालयाचे काम अर्धवट असल्याने आरोग्य यंत्रणेचा सर्व भार प्राथमिक आरोग्य केंद्रा वरच आहे. नळदुर्ग व परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी तेथे कोविड केयर सेंटर उभारणे आवश्यक असल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी व नागरिकांसह नळदुर्ग ला भेट दिली.  सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहामध्ये सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी ८० खाटांचे कोविड केयर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार पर्यंत ५० खाटांचे कोविड केयर सेंटर सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असून तहसीलदार तुळजापूर व मुख्याधिकारी नळदुर्ग यांना जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित ३० खाटांची सोय आवश्यकते नुसार करण्यात येणार आहे. रुग्णांची ने - आण करण्याकरिता मा.आ. राणाजगजितसिंहजी पाटील  यांच्या आमदार निधीमधून देण्यात आलेली रुग्णवाहिका याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये ज्या भागात रुग्णांची संख्या लक्षणीय आहे, त्या भागात प्राधान्याने कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. गृह विलगिकरणा मध्ये राहणारे रुग्ण आवश्यक तेवढी दक्षता घेताना दिसून येत नाहीत. ऑक्सीजन व तापमान वेळोवेळी तपासणे, योग्य आहार  घेणे या गोष्टी पाळल्या जात नाहीत व नंतर अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे गृहविलगीकरण ऐवजी कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. याठिकाणी त्यांची योग्य दक्षता व काळजी घेतली जाते. गाव व परिसरातील सौम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधित रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात येतील.

नळदुर्ग सह अणदूर व करजखेडा येथे देखील आज आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून जागेची पाहणी केली.  अणदूर येथे सामाजिक न्याय विभागाच्या बसवेश्वर सामाजिक वसतिगृहामध्ये तर करजखेडा येथे मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयकुमार फड, उपविभागीय अधिकारी श्री. योगेश खरमडे तहसीलदार तांदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, गट विकास अधिकारी श्री मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवार, नगरसेवक नय्यर जहागीरदार, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, सिकंदर काझी, धिमाजी घुगे, मयूर महाबोले, श्रमिक पोद्दार, रियाज शेख, संभाजी कांबळे, विशाल डुकरे, सागर हजारे, अणदूरचे सरपंच रामचंद्र दादा आलुरे, उपसरपंच डॅा नागनाथ कुंभार,दयानंद मुडके, डॅा अविनाश गायकवाड, दिलीप सिंदफळे, काकासाहेब शेळके, विठ्ठल बागल, प्रवीण भद्रे, अहमद पठाण, सुभाष कळसोले, संजय पाटील, प्रदीप पाटील, हनुमंत पाटील, नंदकुमार माळी, भीमराव साळुंके यांच्यासह नळदुर्ग, अणदूर, करजखेडा व परिसरातील नागरिक उपस्थित  होते.

From around the web