ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर वाढविणार

डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय गृह विलगीकरण नाही
 
ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर वाढविणार

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हयात कोरोना बांधितांचे प्रमाण शहरी भागामध्ये आटोक्यात येत आहे- तथापि ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. त्यामूळे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरर्संची संख्या वाढविण्यात येणार तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय गृह विलगीकरण (होम आयसोलेशनला) परवानगी मिळणार नाही असे मृद  व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयेाजित कोरोना परिस्थीतीच्या आढावा आणि उपाययोजना बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी खासदार ओमप्रकाश निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले  कोरोनाला आळा घालण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेच्या तीसऱ्या टप्यात 16 लाख नागरिकापैकी 5 लाख 85 हजार लोकांची  तपासणी करण्यात आली आहे.या मोहिमेच्या मदतीने जिल्हयातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत आणि यामुळे बांधितांना शोधण्यात येईल.आणि शेवटच्या माणसाची चाचणी करून कोरोना आटोक्यात आणण्याचा  प्रयत्न केला जाईल.जिल्हयात रेमडेसीवर व ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने वैद्यकीय आणि डॉक्टरांनी आवश्यक असेल तेव्हाच याचा आग्रह करावा असे मंत्री महोदय म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, उमरगा,तुळजापूर,कळंब,आणि परांडा या चार तालुक्यामध्ये ऑक्सिजन निर्मीतीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.राज्यातील पहिला साखर उद्योगातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळीच्या धाराशिव कारखान्यावर उभारणार असल्याचेही पालकमंत्री यावेळी म्हणाले राज्यात साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रक्लपातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट उभा करण्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या बैठकीमध्ये निश्चित झाले असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.दररोज 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पालकमंत्र्याना सांगितले.

उस्मानाबाद जिल्हयात सध्या 6589 कोरोना बाधित रुग्ण अजून 9 DCH  15 DCHC  आणि 21 कार्यान्वित आहेत.यामध्ये 3 हजार 831 आयसोलेशन बेड,1035ऑक्सिजन बेड,226 ICUबेड आणि 160 वेंटीलेटर्स आहेत.पालकमंत्री पुढे म्हणाले की सर्व 12 शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट करण्यात आले आहे.कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून68 गांवांमध्ये पुर्णपणे जनता कर्फ्यु अंमलात आणला जात आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कौतुक करतांना म्हणाले की,आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या या यंत्रणेमुळे आपण नक्कीच कोरोनावर मात करु..

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या समक्ष जिल्हयातील सद्यस्थिती विषद करताना म्हणाले की  जिल्हयाला दररोज 14 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असून  8 ते 9 मेट्रीक टनचा पुरवठा होत आहे-150 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध असून साक्षी जन चाल तुटवडा थोड्या प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे आणखी 350 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले 

From around the web