कळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून

 


 कळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून


कळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात  व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले देण्यात आले आहे.

कळंब  येथील उपजिल्हा रुग्णालयात पहिले एक व पी.एम.केअर फंडातून पाच असे एकूण सहा व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून आहेत. तंत्रज्ञाअभावी व्हेंटिलेटर चे इन्स्टॉलेशन न झाल्याने ऑक्सिजन अभावी गंभीर रुग्ण इतरत्र रेफर केले जातात ही गंभीर बाब आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या हजाराच्यावर पोहोचली असून ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवून व्हेंटिलेटर ऑपरेटर तात्काळ नियुक्त करावा म्हणून भाजपाने मागच्या आठवड्यात व्हेंटिलेटरची पूजा करून आंदोलन केले होते. तरीही हा गंभीर प्रश्न धसास न लागल्याने सकल कळंबकरांच्या वतीने या मागणीचे निवेदन दि.२१ सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनावर हर्षद अंबुरे, अशोक शिंदे,तारेख मिर्झा,अँड.अनंत चोंदे, हरिभाऊ कुंभार,नितीन वाडे,अनिल हजारे,अकिब पटेल,लाखन मच्छिंद्र गायकवाड, लखन बळीराम गायकवाड,अँड.शकुंतला फाटक-सावळे,संध्या सोनटक्के,शंकर खंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

From around the web