खेर्डा : बोगस मजूर दाखवून शासनाची रक्कम हडप
कळंब - खेर्डा ग्रामपंचायत विहिरीवर बोगस मजूर दाखवून शासनाची रक्कम हडप करत असून य प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे
रोजगार हमी योजेनेअंतर्गत खेर्डा ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विहिरीचे पोकलेनद्वारे खोदकाम काम पूर्ण केले आहे सदर विहिरीवर एकाही मजूराने काम केलेले नसताना बोगस हजेरी मस्टर दाखवून शासनाची रक्कम हडप केली आहे.
कोरोना काळात मजूराच्या हाताला काम न देता पोकलेन द्वारे काम करून मजुरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे . या प्रकरणातील खेर्डा ग्रा.प. विहिरीवर दाखवलेल्या बोगस मजुराचे इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात यावे तसेच गरजू मजुरांना वंचित ठेवून संगनमताने शासनाची रक्कम हडप करणाऱ्या दोषी सरपंच ग्रामसेवक पालक तांत्रिक अधिकारी रोजगार सेवक गटविकास अधिकारी कळंब इत्यादी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी खेर्डा सुभेदार यांनी केली आहे