कळंब : हावरगावच्या रस्त्याची दुरवस्था

 
चिखलातून करावा लागतो प्रवास... 

कळंब : हावरगावच्या रस्त्याची दुरवस्था


कळंब  ( प्रतिनिधी ) - कळंब तालुक्यातील हावरगाव येथील अंतर्गत रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.त्यात पावसाळ्यात चिखल झाला की , मार्ग काढणे अवघड   जात आहे.  याचा विद्यार्थी  आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याची  दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे  शाळकरी मुलांना चिखलातून मार्ग काढत शाळेत  जावे लागते तर जास्त चिखल असेल तर शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते. सध्या लॉकडाऊन असला तरी इतर कामासाठी विद्यार्थाना चिखलातून मार्ग काढत जावे लागते.


 20 वर्षांपूर्वी आमदार फंडातून या रस्त्याचे काम करण्यात आले होते,  मात्र त्यानंतर या रस्त्याची डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत.

  गेल्या 10 ते 15 वर्षांपासून चिखलातून प्रवास करीत आहोत.रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला व नेते मंडळी यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  या रस्त्याचे काम न केल्यास  गावातील काही लोक आत्मदहन करणार आहेत.  - पांडुरंग काकडे (नागरिक, हावरगाव)

From around the web