कळंब : गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

 
कळंब : गणेशोत्सवावर कोरोनाचे सावटकळंब ( विशाल कुंभार) - दरवर्षी  मोठ्या उत्साहात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा कोरोनामुळे  साध्या  पद्धतीने साजरा केला जात आहे.  कळंब तालुक्यात केवळ सात ठिकाणी सार्वजनिक गणेश  मूर्तीची  स्थापना करण्यात आली आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत तसेच फक्त 3 ते 4 फुटापर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

शनिवार पासून गणेशोत्सवाला  सुरूवात झाली आहे. नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यातील विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा कोरोनामुळे विघ्न आले आहे.कळंब शहरासह तालुक्यात यावर्षी गणपती बप्पाचे आगमन साध्या पद्धतीने झाले असून कोरोनासारख्या महामारीमुळे यावर्षी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना कमी प्रमाणात झाली आहे.यावर्षी गणेश मूर्तिकार यांना सुद्धा मोठ्या गणपतीची मागणी कमी प्रमाणात असून शासनाने चार फूट उंची पेक्षा मोठी गणपती स्थापना करण्यावर निर्बंध आणल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

From around the web