पावसाने ओढ दिल्याने संयुक्त पीक पाहणीचे आदेश

- पालकमंत्री शंकरराव गडाख
 
s

उस्मानाबाद -  गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पीक सुकू लागली आहेत. त्यातच सोयाबीन पिकास पावसाची खूप गरज असताना पाऊस पडत नसल्याने सोयाबीन पीक धोक्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घेत पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मस्सा (खं) येथील सोयाबीन पिकाची पाहणी करून जिल्ह्यात संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

मस्सा (खं) येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्याचे लोकार्पण, स्वस्त धान्य दुकानाचे उदघाटन, नवीन व्यावसायिक गाळ्याचे भूमी पूजन, रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आदी विविध विकास कामांची सुरुवात पालकमंत्री श्री. गडाख यांच्या हस्ते करण्यात आली, त्यानंतर श्री.गडाख यांनी तेथील शेतकरी शंकर शिंदे-पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पीकाची पाहणी करून शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना संयुक्त पीक पाहणी करून नियमानुसार पीक विमा मिळवून देण्यासाठी पीक तपासणी अहवाल विमा कंपनीस  पाठवून विमा मिळवण्याचे प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

यावेळी आमदार कैलास पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी कापसे, सरपंच राजश्री धनंजय वरपे आदी उपस्थित होते .

From around the web