कोरोना उपाय योजना करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात संयुक्तपणे मोहीम 

 
कोरोना उपाय योजना करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात संयुक्तपणे मोहीम

उस्मानाबाद - सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. त्या कोरोना वाढीबरोबरच आरोग्य विभाग समोरील आव्हाने वाढत आहेत. यात पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी घेणे.सहवासीतांच्या टेस्टींग करणे, कोविड लसीकरण करणे यासोबत इतर नॉन कोविड आरोग्य सेवा ज्या गरोदर माता या बाबी अखंडीत चालू ठेवाव्या लागतात. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी होण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी यांनी संयुक्तपणे मोहिमेच्या स्वरुपात झोकून दिले आहे.

       कोरोनाला अटकाव करता येईल. म्हणून दि.7 एप्रिल या जागतीक आरोग्य दिनापासून मिशन कोरोना प्रतिवीर मोहिम किमान तीन महिने किंवा कोरोना आटोक्यात येईपर्यंत ही मिशन चालू राहणार आहे. याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना आदेशीत करण्यात आले आहे.

      उस्मानाबादचे पालकमंत्री शकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी ही मोहिम चळवळीच्या धर्तीवर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मिशन कोरोना प्रतिबंध मोहिमेत प्रत्येक गाव पातळीवरील शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व इतर शासकीय निमशासकीय स्वयंसेवक यांची समिती असेल.या समितीत आशा, अंगणवाडी सेविका याही गरजेनुसार घेण्यात येतील.

या समितीमार्फत गावात 45 वर्षावरील लसीकरणास पात्र असतील.अशा लोकांचा सर्व्हेक्षण करुन टेस्टींगसाठी मदत करणे, कोविड पॉझीटिव्ह गृह विलगीकरणातील रुग्णांवर देखरेख ठेवून आरोग्य विभागाशी समन्वय करणे, लसीकरणासाठी लोकांमध्ये जाणीवजागृती करुन त्यांचे लसीकरण करुन घेणे,कोविड बाबत त्रिसूत्रीचा वापर म्हणजेच मास्कचा वापर,वारंवार हात स्वच्छ धुणे व अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व सामाजिक अंतर ठेवणे यासाठी विविध प्रयत्न करणे.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गावपातळीवरच पोर्टलवर भरणे व या कोरोना काळात अनाथ,निराधार वंचित घटकातील लोकांना इतर सुविधा मिळतील.यासाठी समन्वय करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.यामुळे कोरोना आपत्तीवर सहजपणे मात करुन लोकांमधील भिती कमी होण्यास मदत होणार आहे. 

From around the web