माजी सैनिकांना नौकरीची संधी

 
माजी सैनिकांना नौकरीची संधी

उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्हयातील माजी सैनिकांना मराठवाडा ईकेा बटालियन,136 इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना ईको महार, मध्ये सोल्जर जी.डी./ ट्रेडसमॅन या पदाकरिता हवालदार,नायक,लान्स नायक,शिपाई या पदावरुन पेशंन घेऊन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांमधून 35 जागांवर भरती करावयाच्या आहेत.   हवालदार पदावरुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा 45 पर्यंत व त्याखालील पदावरुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 42 पर्यंत वयोमर्यादा आहे. सैन्यसेवेतून डिस्चार्ज नंतरचा कालावधी  पाच वर्षापेक्षा जास्त नसावा. मेडिकल कॅटॅगरी SHAPE-I व चारित्र Exemplary or Good आवश्यक आहे.

या नौकरीमध्ये दरमहा एकूण वेतन 38000 रुपये व सुटया, रेशन इतर सवलती नियमाप्रमाणे लागू आहेत. वयाच्या 50 वर्षापर्यंत सेवा करता येणार आहे. या नौकरीत कोणतीही पेशंन लागू नाही याची नोंद घ्यावी.तसेच नौकरी सोडावयाची असेल तेव्हा तीन महिन्याचा नोटीस कालावधी लागू आहे.

         या भरती बी.ई.जी. सेंटर, दिग्गी, पुणे येथे दि. 05 ते 07 एप्रिल 2021 रोजी आहे. त्यासाठी पात्र माजी सैनिकांनी त्यांचे डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.,शैक्षणिक दाखले,सोल्जर जी.डी.महाराष्ट्राचे डोमासाईल प्रमाणपत्र,ॲफीडेव्हीट व फोटोग्राफ सोबत घेणेबाबत ऑफीसर-इन-चार्ज,  रेकॉर्ड ब्रिगेड ऑफ द गार्ड  यांनी कळविले आहेत.

या भरतीसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी कळविले आहे.

From around the web