जयंत पाटील गुरुवारी उस्मानाबाद दौऱ्यावर 

 
s

उस्मानाबाद -राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील हे उद्या दि.24 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम असा-

     मंत्री श्री.पाटील यांचे सोलापूर येथून सकाळ 10 वा तुळजापूर येथे आगमन होईल.सकाळी 10 ते 11 या वेळेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील.सकाळी 11 ते 11.45 यावेळेत तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालय,तुळजापूर विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.तर 11.45 ते 12.30 यावेळेत पुजारी मंगल कार्यालयातील उमरगा मतदार संघाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.दुपारी 12.30 वा तुळजापूर येथून तेर कडे प्रयाण करतील.दुपारी 1 वा तेर येथे आगमन व दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत कु.सक्षणा सलगर यांच्याकडे राखीव.तेर येथून 2.00 निघून दुपारी 2.30 वा उस्मानाबाद येथे आगमन होईल.

   दुपारी 2.30 ते 3.30 यावेळेत जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस उपस्थित असतील.दुपारी 3.30 ते 4.15 या वेळेत उस्मानाबाद येथील परिमल  मंगल कार्यालयातील जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीस उपस्थित राहतील.परिमल मंगल कार्यालयात दुपारी 4.15 ते 5.00 या वेळेत उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील.सायंकाळी 6.00 ते 7.00 या वेळेत वाशी येथे भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.सायंकाळी 7.00 वा वाशी येथून प्रयाण करुन रात्री 8.00 वा उस्मानाबाद येथे त्यांचे आगमन होऊन ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

        दि.25 जून 2021 रोजी सकाळी 9 ते 9.30 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद होईल आणि सकाळी 9.30 वा श्री.पाटील मोटारीने औसा (जिल्हा लातूर) कडे प्रयाण करतील.

From around the web