जवळा, गिरवली, तेरखेडा, करवंजी येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

परंडा: प्रभाकर मधुकर गवारे, रा. जवळा (नि.), ता. परंडा यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 13- 14.06.2021 दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साड्या- 20 नग व 1,00,000 ₹ रोख रक्कम तसेच गावकरी- गणेश पांडुरंग चव्हाण यांचा भ्रमणध्वनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रभाकर गवारे यांचा भाचा- अजय रमेश मिरगणे, रा. जवळा (नि.) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: रणजीत मोटे, रा. गिरवली यांच्या घराचे कुलूप दि. 14 जून रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील- कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या पहारेकरी- विलास सर्जेराव मोटे, रा. अंजनसोंडा, ता. भुम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: बेंगलोर- औरंगाबाद मार्गे दिल्ली येथे जात असलेला ट्रक क्र. एच. आर. 55 एजे 0186 हा दि. 14 जून रोजीच्या रात्री तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील उड्डान पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याबाजूस पलटला. यावर नमूद ट्रकचे चालक- जमशेद इद्रीस खान, रा. अडबर मेवात, राज्य- हरियाणा हे सहायकासह मदतीसाठी महार्मालगत असलेल्या हॉटेलकडे गेले असता दरम्यानच्या काळात ट्रकचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आतील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ, खुर्च्या, घड्याळे, सौंदर्य प्रसाधने असे इत्यादी साहित्यांचे 846 खोकी चोरुन नेली. अशा मजकुराच्या जमशेद खान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा: सदाशिव बापूराव महानुर, रा. करवंजी, ता. लोहारा यांच्या शेतातील पत्रा शेडजवळ ठेवलेल्या सोयाबीन बियाणे- 11 पिशव्या, खत- 10 पोती, लसून- 100 पेंढ्या व टारपोलीन दि. 14 जून रोजीच्या पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सदाशिव महानुर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web