उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली... 

तीन दिवसात ९३ रुग्ण आढळले...
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. जिल्ह्यात सोमवारी  १८, मंगळवारी ३५ आणि बुधवारी ४० असे ९३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०८ झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या २० च्या आत आली होती, पण नवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आल्यापासून जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवार दि. ५ जानेवारी रोजी एकूण ४० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात उस्मानाबाद ८, तुळजापूर ५, उमरगा ४, लोहारा १, कळंब १६, वाशी ३, भूम १, परंडा २ असा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ९०६ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ६७३ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

d


 

From around the web