उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली तरी  मृत्यू संख्या "जैसे थे "

दिवसभरात ५ मृत्यू , मागील काही दिवसातील ३  मृत कोरोना रुग्णाची नोंद 
 
corona
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ .२०  टक्के तर ‌मृत्यूचे २.३२ प्रमाण टक्के

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १२  जून (शनिवार) रोजी ११७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २१८  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ५  जणांचा मृत्यू झाला तर  मागील काही दिवसातील ३  मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली तरी  मृत्यू संख्या जैसे थे आहे, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ७३२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५४ हजार ५७८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३१७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८३७   झाली आहे.

आकडेवारी लपविली 

गेल्या १५  दिवसापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके  कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

From around the web