उस्मानाबाद जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी ४३ कोरोना पॉजिटीव्ह, पाच मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९३
Thu, 26 Aug 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २६ ऑगस्ट ( गुरुवार ) रोजी ४३ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तसेच पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार ८२० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६३ हजार २३२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४५६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९३ झाली आहे.
मागील काळात झालेल्या ५३९ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३३२ ,कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.