उस्मानाबाद जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी ५६९ पॉजिटीव्ह, १६ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१५५
Apr 25, 2021, 20:20 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २५ एप्रिल (रविवार) रोजी तब्बल ५६९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिलासाजनक बातमी म्हणजे आज कोरोनाबाधित रुग्णापेक्षा उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णाची संख्या जास्त आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ३४५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २७ जार ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८५२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१५५ झाली आहे.