उस्मानाबाद जिल्ह्यात २० एप्रिल रोजी ६४५ पॉजिटीव्ह,२१ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९८१
Apr 20, 2021, 21:50 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २० एप्रिल ( मंगळवार ) रोजी तब्बल ६४५ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २१ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या सात दिवसात ११४ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ८६१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २४ जार १२४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७५६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९८१ झाली आहे.