उस्मानाबाद जिल्ह्यात शहरी १२ तर ग्रामीण १० केंद्रावर मिळणार कोविशिल्ड लसींचे डोस

 
s

उस्मानाबाद  - दि.११  सप्टेंबर रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्यावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. 

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व मतदाता कार्ड यापैकी कोणतेही एक ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्यावरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .असे आवाहन करण्यात आले आहे. 

ग्रामीण रुग्णालय पुढीलप्रमाणे - लोहारा, मुरूम, सास्तूर, तेर, भूम, वाशी तर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा, कळंब व परंडा तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दि. १० सप्टेंबर   रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. 

 तसेच ग्रामीण भागातील १० लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्यावरील  वयोगटातील नागरिक, जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे - 

उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्या मंदीर आणि जिल्हा परिषद प्रशाला तर कळंब येथील फुले आंबेडकर वाचनालय तसेच तुळजापूर येथील नगर परिषद शाळा क्र.३ तर परंडा येथील सिद्धीवाल कॉम्प्लेक्स, करमाळा रोड आणि डॉ. गायकवाड हॉस्पिटल, मंगळवार पेठ तसेच लोहारा येथील भारत माता मंदिर व वाशी येथील जि.प.प्रा. शाळा शिवशक्ती नगर तर भूम येथील रविंद्र हायस्कूल व उस्मानाबाद येथील पोलिस हॉस्पिटल या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत.

 ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web