उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत ५४.९६ टक्के मतदान
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
Updated: Dec 1, 2020, 16:30 IST

उस्मानाबाद - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ५४.९६ टक्के मतदान झाले. मतदान सर्वत्र शांततेत पार पडले.
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ तालुक्यात एकूण ७४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी चार वाजेपर्यंत एकूण ३३ हजार ६३२ पैकी १८ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीधरसाठी मतदारांची ऑक्सीमीटर,इन्फ्रारेड थर्मामीटर द्वारे तपासणी करण्यात आली तसेच सॅनिटायजरचा वापर केला गेला.
औरंगाबाद पदवीधरसाठी मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही आणि जीपीआरएस प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर व निवडणूक विभाग लक्ष ठेवून होते.
एकूण आकडेवारी पाहा