उस्मानाबाद जिल्ह्यात ५३ पैकी ५ रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटीव्ह 

 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे.डिसेंबर महिन्यात कोरोना पॉजिटीव्ह आलेल्या ५३ पैकी ५ रुग्ण ओमायक्रॉन आढळले आहेत. 


* Institute of Genetics & informative biology,New Delhi... येथे दर महिन्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर RT- PCR प्रयोगशाळा येथून 100 RT- PCR पॉझिटिव्ह स्वाब नमुने Genomic sequencing साठी  पाठवले जातात...

दिनाक 28/12/2021 रोजी IGIB New delhi येथे   डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्ह आलेल्या 53 कोविड रुग्णांचे स्वाब नमुने genomic sequencing साठी पाठवले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून 53 पैकी 5 रुग्णांचा Omicron Positive असा अहवाल प्राप्त झाला आहे.

* 5 omicron पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3 कळंब, 1 उमरगा व 1 उस्मानाबाद येथील रहिवासी असून सर्वांचा 10 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ७५ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

From around the web