उस्मानाबादेत जयंत पाटलांसमोर भाजपच्या एका आमदाराने अक्षरशः जोडले हात

कृष्णा - मराठवाडा उपसा सिंचन योजना तुम्हीच पूर्ण करू शकता; केली वाहवा...
 
d

उस्मानाबाद - सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापले असतानाच उस्मानाबाद येथील जलसंपदा विभागाच्या बैठकीत भाजपच्या आमदारांनी चक्क जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कामकाजावर अक्षरशः स्तुतीसुमने उधळल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


जलसंपदा विभागाच्या बैठकीत भाजपच्या आमदारांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांसमोर अक्षरशः हात जोडत आता कृष्णा - मराठवाडा उपसा सिंचन योजना तुम्हीच पूर्ण करू शकता अशा शब्दात स्तुती केली. 


इतका पॉझिटिव्ह जलसंपदा मंत्री मिळाला आहे तर निधीची कमतरता भासणार नाही. त्यामुळे प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी अधिकार्‍यांनी जास्तीत जास्त मागणी करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवल्याने उस्मानाबाद जिल्हयाला न्याय मिळेल असा विश्वास शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.


कृष्णा - मराठवाडा उपसा सिंचन योजनेत येणारे अडथळे दूर करत २०२३ पर्यंत कोणत्याही परिस्थिती ही योजना पूर्ण करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या


राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद पाटबंधारे महामंडळाची आढावा बैठक घेतली. याबैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली तसेच प्रकल्पांतील अडचणीही जाणून घेतल्या.


कृष्णा मराठवाडा या दोन्ही सिंचन प्रकल्पाला १५०० कोटीचे अतिरिक्त कर्ज उभं करण्याची तरतूद करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

From around the web