नळदुर्गमध्ये अत्यावश्यक सेवा दुकानाबरोबर अन्य दुकानेही सताड उघडी 

पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे नळदुर्ग ठरतोय कोरोना हॉटस्पॉट 
 
d

नळदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक दुकाने सोडून अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. या आदेशाला हरताळ फासण्याचे काम नळदुर्ग पोलीस करीत आहेत. 

मेडिकल, किराणा, दूध  वगळता अन्य दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे .  हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहे. तरीही नळदुर्गमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आज ( शनिवारी ) सताड उघडी दिसत आहेत. 

नळदुर्ग बसस्थानक परिसरात पोलीस चौकी आहे, मात्र पोलीस आंधळ्यासारखे वागत आहेत. त्यांच्या समोरच  हॉटेल चक्क उघडे आहेत, आत गिऱ्हाईक  बसले आहेत तसेच ऍटोमोबाईल्स, सलून, मोबाइल दुरुस्ती दुकाने सताड उघडी आहेत. तसेच अनेक  दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून आत सुरु आहेत. 

कोरोना सुरु झाल्यापासून नळदुर्ग कोरोनाचा हॉटस्पॉट  ठरला आहे. सपोनि जगदीश राऊत यांचा कसलाही वचक नसल्याने कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नळदुर्गमध्ये आढळले आहेत. 

एकीकडे नळदुर्ग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. दुसरीकडे नळदुर्ग आणि परिसरात अवैध धंदे तेजीत सुरु आहेत. पोलीस हप्ते खाण्यात मग्न आहेत. काही भुरटे पत्रकार हजार - पाचशे घेऊन राऊत यांची खोटी स्तुती आपल्या पत्रावळीत करीत आहेत. त्यामुळे त्यांचे हासू होत आहे. 

From around the web