धाराशिव जिल्ह्यात १ लाखांवर नागरिकांची होणार आरोग्य तपासणी व मोफत उपचार

१२०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप
 
s
डॉ.पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

धाराशिव  -  जेष्ठ नेते,  माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंहजी पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात गुरुवार १ जून  पासून आरोग्य तपासणी शिबिरे होणार असून वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत १ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार केले जातील.याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आ.राणाजगजीसिंह पाटील यांनी केले आहे.

s

तेरणा ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून लाखो नागरिकांची विनामूल्य आरोग्य तपासणी, करून औषधोपचार केले जाणार आहेत.तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे अशा रुग्णांना तेरणा स्पेशालिटी रुग्णालय नेरुळ,नवी मुंबई येथे येण्याजाण्याच्या खर्चासहित मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत. 

याच अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जून महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मोफत नेत्र तपासणी करून ज्या ज्या नागरिकांना चष्मा आवश्यक आहे अशा १२०० नागरिकांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.उद्या १० व्हीलचेअर चे देखील वाटप करण्यात येणार आहेत.डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सदृढ रहावे यासाठी  कायम सजग असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आरोग्य जागराचा संकल्प केला असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.

d

 

From around the web