नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांमध्ये विमा कंपनीस कळवावे
उस्मानाबाद -जिल्हयात काही ठिकाणी गारपीट/वेगाचा वारा इत्यादी नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास नुकसानीची पूर्व सूचना विमा कंपनीस करावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या कालावधीत रब्बी हंगामातील विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खल, गारपीट,ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.तेव्हा विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्याने सर्व नं. निहाय बाधित पीक व बाधित पिकांच्या क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे.
पिक नुकसानीची सूचना विमा कंपनीस, संबंधित बँक, कृषी विभाग/महसूल विभाग यांच्याकडे किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी किंवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास नुकसानीची माहिती विमा कंपनी प्रतिनिधी यांना देण्यात यावी.
तसेच केंद्र शासनाद्वारे तयार केलेले Crop Insurance किंवा Farmmitra या अॅप मध्ये देखील पूर्व सूचना देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. विमा संरक्षित पिकांबाबत शेतकऱ्याने नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक राहील.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.